Sunday, June 21, 2026
Homeभंडाराभाराभर समस्यांचा डोंगर उभा असताना १ कोटींचे एलईडी स्क्रीन.. - कंत्राटदारांनी सांगितलेले...

भाराभर समस्यांचा डोंगर उभा असताना १ कोटींचे एलईडी स्क्रीन.. – कंत्राटदारांनी सांगितलेले फसवे प्रयोग येणार अंगलट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहरातील ४ प्रमुख चौकांत तब्बल १ कोटी रुपयांचे ४ एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. शहरातील रस्ते खड्डेमय झालेत.नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.नगर परिषद शाळांना ईमारती नाहीत.शिक्षकांची पदे रिक्त आहेत.अशा एक नव्हे भाराभर समस्यांचा डोंगर उभा असताना या अनाठायी खर्चाची उधळपट्टी केली जात आहे.
जाहिरातीमधून महसूल वाढविण्यासाठी भंडारा नगरपालिकेने शहरात चार ठिकाणी एक कोटी रुपयांचे एलईडी स्क्रीन लावले आहेत.या जाहिरातीमधून तोट्यात असलेली पालिका नफ्यात येत असेल,तर आणखी चार चौकात एलईडी स्क्रीन लावा; अशा गमतीदार चर्चा आहेत.दरम्यान,एलईडी स्क्रीनसंदर्भात माहितीनुसार शास्त्री चौक,त्रिमूर्ती चौक, लायब्ररी चौक आणि राजीव गांधी चौक अशा चार ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले.
याचा बजेट ४ एलईडी स्क्रीनचा खर्च १ कोटी रुपयांचा आहे.हे ऐकून विश्वास न बसल्यामुळे पुन्हा एकदा विचारून खात्री करण्यात आली.
इतकी महागडी एलईडी मिळते तरी कुठे?👇
 एलईडी स्क्रीन ज्याठिकाणी लावण्यात आले, त्याठिकाणी पाच फूट लांबी,दोन फूट खोल खड्डा खोदून सिमेंट क्राँक्रीटचा आयाताकृती चबुतरा तयार करण्यात आला.त्या चबुतऱ्यावर २० फूट लोखंडी खांबावर एलईडी स्क्रीन लावण्यात आले.हे एलईडी स्क्रीन विजेवर चालणार आहे.त्याचठिकाणी सोलर पॅनेल दिले असते,तर विजेची बचतही झाली असती. परंतु तसे करण्यात आले नाही.सोलर पॅनेलचे वेगळे इस्टिमेट बनवून त्यातही मलिदा लाटण्याची योजना कंत्राटदार आणतील यात शंका नाही.शहरात लावलेल्या या चारही एलईडी स्क्रीनचा खर्च एवढा येत नसताना यासाठी १ कोटी खर्चाचे देयके कोणत्या कंपनीतून आणले जाते हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
खरचं जाहिरातीतून महसूल मिळणार का? शास्त्री चौक,त्रिमूर्ती चौक,लायब्ररी चौक आणि राजीव गांधी चौक अशा चार ठिकाणी लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर भंडाऱ्यातील व्यापारी जाहिराती देणार का? जाहिराती दिले तरी त्यातून अपेक्षित महसूल मिळणार का? हे एलईडी स्क्रीन लावण्यासाठी आलेला १ कोटी रुपयांचा खर्च पुढच्या पंचवार्षिकमध्ये निघाला तरी हा प्रयोग सार्थक झाला,असे म्हणता येईल.परंतु,भंडारा हे महानगर असल्याची जाणीव करून देणाऱ्या कंत्राटदारांनी सांगितलेले असे फसवे प्रयोग अंगलट येण्याची शक्यता अधिक असते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!