- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भरधाव ट्रकने मागेहून आपल्या बाजूने जाणाऱ्या महिलेच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याने ४९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल,शुक्रवार १७ जानेवारीच्या दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास तुमसर शहरातून जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्गावरील नवीन सस्थानकासमोर घडली.कौशल्या रुधिर दहाट ४९ वर्षे, रा.आंबेडकरनगर, तुमसर असे मृत महिलेचे नाव आहे.
घटना घडताच नागरिकांचा जमाव होऊन संताप व्यक्त केल्याने काही काळ तणाव उद्भवला होता.महिला आपल्या बाजूने स्कूटी एमएच ३६/ एएन-१५१० क्रमांकाच्या दुचाकीने परत जात असतांना मागून भरधाव वेगात आलेल्या एमएच ३५/ एजे १७०० क्रमांकाच्या ट्रकने कौशल्याला जबर धडक दिली. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या अपघाताची शहरात चित्रफीत व्हायरल झाली आहे.घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठले, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.चालक इम्रान इकबाल शेख वय ३० वर्षे,रा.डब्बे टोला,ता.तिरोडा याला पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले आहे.
- Advertisement -

