Wednesday, August 5, 2026
Homeचंद्रपूरबारावीच्या दोन विषयात नापास झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

बारावीच्या दोन विषयात नापास झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- आज राज्यभरात बारावीचा निकाल जाहीर झाला. सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर आनंद साजरा करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील एका विद्यार्थ्याने बारावीत अपयश आल्याने जीवनयात्रा संपवली.आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे,रा.नेरी,ता. चिमूर असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.या घटनेने संपूर्ण नेरी गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनूसार,चिमूर तालुक्यातील नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता.बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करिन असा त्याचा आत्मविश्वास होता. आज मंगळवारी मात्र निकाल लागताच नेट वरून निकाल पाहताच त्याला धक्का बसला.अभ्यास व मेहनत करूनही त्याला इंग्रजी व इतिहास या विषयात कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला त्यामुळे तो नैराश्यात गेला.त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेत घरात कुणीही नसतांना दरवाजा बंद करून दोराने दुपारी २ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना सायंकाळी उघडकीस आली.

सदर घटनेची माहिती बाहेरून सायंकाळी ६ वाजता दरम्यान घरी परत आलेल्या भावाला माहित झाली.घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याने आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला.त्यावेळी भावाला धक्का बसला.मृत्तदेह घराला लटकलेल्या अवस्थेत आधळून आला. शेतात कामाला गेलेले आई वडील घरी पोहचले. त्यांनाही धक्का बसला.मृत्यूची वार्ता गावात पसरताच आकाशला बघण्यासाठी घरासमोर गर्दी झाली.सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.त्यांनी तपास सूरू केला आहे.परंतू आकाशने आज घोषीत झालेल्या बारावीच्या परीक्षेत दोन विषयात नापास झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कारण समोर येत आहे.सदर घटनेने नेरी गावावर शोककळा पसरली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!