Friday, June 19, 2026
Homeवर्धातेंदुपत्ता संकलन करणे जीवावर बेतले; वाघाच्या हल्ल्यात इसम ठार..

तेंदुपत्ता संकलन करणे जीवावर बेतले; वाघाच्या हल्ल्यात इसम ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

वर्धा :- तेंदूपत्ता तोडण्यासाठी लिंगा मांडवी जंगल परिसरात गेलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना कारंजा तालुक्यातील धावसा हेटी शिवारातील लिंगा मांडवी बीटात घडली. देवराव श्रावण राऊत असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

देवराव राऊत हे मागील काही वर्षांपासून धावसा हेटी येथे वास्तव्यास होते.ते तेंदुपत्ता तोडण्यासाठी गावातील काही महिला- पुरुषांसोबत लिंगा मांडवी जंगल परिसरात गेले होते.त्यांच्यासोबत काही वन मजूर देखील होते.दाट जंगलात तेंदुपत्ता तोडत असताना सुरुवातीला त्यांना अस्वल दिसले.पण देवराव याने आरडा-ओरड करून अस्वलीला जंगलात पिटाळून लावले.त्यानंतर देवराव व त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला तसेच सहा ते सात पुरुष सहकाऱ्यांनी पुन्हा तेंदुपत्ता गोळा करण्याच्या कामाला सुरवात केली.याच दरम्यान हि घटना घडली.

देवराव सोबत असलेल्यांना झुडपातून काहीतरी पळाल्याचा आवाज आला.यामुळे त्यांनी देवरावला आवाज दिला.परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याने देवराव याचा शोध घेण्यास सुरूवात केली.याच दरम्यान देवरावचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला.तर काही अंतरावर झुडपात पट्टेदार वाघ असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी धाडस करून वाघाला जंगलात पळवून लावले.सदर घटनेची माहिती वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर गजभिये आणि त्यांचे सहकारी व कारंजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेत उत्तरिय तपासणीसाठी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!