Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरबार मालकाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांची धाड …

बार मालकाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांची धाड …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- शहरातील कस्तुरबा मार्गावर असलेल्या प्रिन्स बार मालकाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दिनांक-५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता धाड टाकताच मद्य शौकीनांनी पळ काढला.मौका पंचनामा करून बार मालकाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी; अशा आशयाचे पत्र शहर पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठविले आहे.नियमान्वये बार ॲण्ड रेस्टॉरंट किंवा वाईन शॉपी सकाळी ११ वाजता उघडण्यात यावी; असा नियम आहे.पण काही दिवसांपासून प्रिन्स बार सकाळी ८ वाजताच उघडत असल्याची तक्रार शहर पोलिसांकडे प्राप्त झाली होती.त्यामुळे पाळत ठेवून शहर पोलिसांनी धाड टाकली.पोलिस धडकताच बारचे व्यवस्थापक व मद्यपींमध्ये खळबळ उडाली.मद्यपींनी तिथून पळ काढला.दरम्यान घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुर्के,उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनीही भेट दिली.चौकशी अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला सादर करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!