- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीस तपासून मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास ठेवून अत्यंत दुःखी अंतःकरणाने कुटुंबीयांनी मृतदेह घरी नेला.निधनाची बातमी समजताच नातेवाईक आणि मित्र परिवाराने त्यांच्या घरी गर्दी केली.अश्यातच घरी अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच सकाळी साडेआठच्या सुमारास ज्याला मृत घोषित केले अश्या व्यक्तीने अचानकपणे डोळे उघडले आणि क्षणात त्यांचा श्वास सुरू झाला.मृत घोषित केलेला माणूस जिवंत झाल्याचे पाहून कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.या दरम्यान उपस्थित नागरिकही अवाक् झाले. कुटुंबीयांनी कोणतीही वेळ न घालवता त्या व्यक्तीस
पुन्हा तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले.परंतु,डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आणि सायंकाळची त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सदरची अचंभित करणारी घटना वर्धा जिल्ह्याच्या आर्वी शहरातील विठ्ठल वॉर्डात घडली असून मनोज उत्तमराव बोरकर वय ४० वर्षे,रा.विठ्ठल वॉर्ड, आर्वी,ता.आर्वी,जि.वर्धा असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.मनोज हे आर्वी शहरातील ताज बेकरी येथे काम करत होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.मात्र,मृत्यूच्या दाढेतून परत आलेले मनोज बोरकर पुन्हा निघून गेल्याने परिसरात काहीकाळ मोठी खळबळ उडाली.
- Advertisement -

