Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजफव्वारा चौक ते नैनपूर मार्ग खड्डेमय; मार्गाची दुरुस्ती न केल्यास बेशरमाची झाडू...

फव्वारा चौक ते नैनपूर मार्ग खड्डेमय; मार्गाची दुरुस्ती न केल्यास बेशरमाची झाडू लावू- पिंकू बावणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-ऐन पावसाळ्यात देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीतील कित्तेक मार्गांची दैनावस्था होऊन खड्डेमय झाली आहेत.शहराच्या मध्यभागी असलेल्या फव्वारा चौक ते नैनपूरकडे जाणाऱ्या काही अंतरावरील मार्गाची खड्ड्यांमुळे वाट लागलेली आहे.पावसाच्या पाण्याने सदरचे खड्डे भरू लागल्याने ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ अशी अवस्था होऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रस्त्यावरून आवागमन करणारे नागरिक तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.अश्यातच शहरातील जलमय होऊन भरलेले खड्डे निदर्शनास येऊनही प्रशासनाने अद्याप डोळे उघडलेले नाहीत.त्यामुळे फव्वारा चौक ते नैनपूरकडे जाणाऱ्या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करा,अन्यथा निष्क्रियतेच्या विरोधात मार्गांवरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून आंदोलन छेडू,असा इशारा काँग्रेसचे युवा नेते पिंकू बावणे यांनी आज,बुधवार २ जून रोजी फव्वारा चौक ते नैनपूर मार्गाची झालेल्या दयनीय अवस्थेतील पाहणी दरम्यान दिला आहे.
देसाईगंज शहरातील फवारा चौक ते नैनपूर मार्गाचा संपूर्ण रस्ता अक्षरशः मृत्यूच्या खड्ड्यांनी भरू लागला आहे.खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने रस्ता वा खड्डा हेच कळेनासे झाले आहे.पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी दयनीय झाल्याने वाहतुकीस घातक बनला आहे.सदरच्या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी,नागरिक,रुग्ण,दुचाकीस्वार आणि पादचारी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.मात्र, नगरपरिषद प्रशासन अद्यापही निद्रावस्थेत गेले असल्याने खड्ड्यांमुळे शहराला गालबोट लागू लागले आहे. अश्यातही प्रशासन डोळेझाक करीत असेल तर आंदोलन करू,असेही बावणे यांनी स्पष्ट केले आहे. प्रसंगी दैनावस्था झालेल्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करतांना माजी नगरसेवक गणेश फाफट,राजू गराडे,नरेश लिंगायत,राहुल उईके,अमन गुप्ता,अमित सलामे,वंदेश माटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!