- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे प्रियकर बघितलेत,परंतु प्रेमप्रकरण बहरून आल्यानंतर प्रेमविवाहासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून प्रियकराने चक्क बाहेर राज्यातून बंदूक(पिस्तूल) विकत घेऊन आणली आणि प्रेयसीला संपविण्याचा बेत आखून दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला उभा होता.त्याचवेळेस त्याच मार्गावर पोलिसांची गस्त सुरू होती.पोलिसांना शंका आल्याने त्याची झाडाझडती घेतल्यावर सर्व प्रकार उघडकीस आल्याची खळबळजनक घटना काल,मंगळवारी १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मूल-ताडाळा मार्गावर असलेल्या महाबीज केंद्राजवळ घडली.गौरव नितीन नरुले वय २६ वर्षे,रा.मूल,वॉर्ड क्रमांक-१२ असे आरोपी प्रियकराचे नाव असून प्रेयसीची हत्या केल्यानंतर तो स्वतःही आत्महत्या करणार असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.मूल पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल,दोन जिवंत काडतुसे,मोबाइल व एम.एच-३४ सी.ए-७३४२ क्रमाकांची दुचाकी,असा एकूण १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला व भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपी गौरवला मूल तालुका न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.अटकेची कारवाई प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव,प्रभारी पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार आत्राम,पोलिस हवालदार भोजराज मुंडरे,चिमाजी देवकते,पंकज बगडे आदींनी केली.
- पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड👇
२६ वर्षीय गौरव नरुले याचे एका युवतीसोबत प्रेम संबंध होते.हळूहळू प्रेम बहरून आले.त्यामुळे दोघांनीही प्रेमविवाह करण्याचे ठरवले.मात्र,काही महिन्यांपूर्वी प्रेयसीने प्रेमविवाह करण्यास नकार दिला.त्यामुळे गौरव हा नैराश्यात गेला.त्याला काही सुचेनासे झाल्याने आता सर्वकाही संपवूनच टाकू,असे म्हणत त्याने बिहार गाठले व बिहार राज्यातून देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे खरेदी केले.त्यानुसार तो काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास प्रेयसीची हत्या करून स्वतःला संपविण्याच्या उद्देशाने तो महाबीज केंद्राजवळ उभा होता.त्याच्यावर पोलिसांची शंका बळावली आणि मूल पोलिसांनी अटक केली.
- Advertisement -

