- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरापासून देसाईगंज (वडसा)मार्गे काही अंतरावर असलेल्या भूतीनाल्यावरील पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू असून पाऊस येताच ब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद पडत असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.ब्रम्हपुरी शहर हे डॉक्टरांचे शहर म्हणून उदयास आले असल्याने शहरातील रुग्णालयात गडचिरोली, गोंदिया,भंडारा व इतर जिल्ह्यातील शेकडो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जात असतात.पूर्वी भूतीनाला कमी उंचीचा असल्याने नवीन उंच पुलाचे बांधकाम तब्बल दोन वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही.पाऊस आला की,दररोजची वाहतूक ठप्प होते.विद्यार्थी,व्यापारी व रुग्णांचे हाल होतात. पुलाच्या बाजूने एक रपटा तयार करण्यात आला.मात्र, पाऊस पडल्यानंतर सदरचा रपटा बंद होतो.वारंवार वाहतूक बंद होत असल्याने नागरिकांसह वाहनधारक हैराण झाले असल्याने पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
- Advertisement -

