- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- ‘धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान’ (DAJGUA) साठी प्रकाशित झालेल्या जाहिरातीचा शासकीय यंत्रणेशी कोणताही संबंध नाही,असे स्पष्टीकरण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.
विजय एस.बाहेकर अध्यक्ष,जन शिक्षण संस्थान, गडचिरोली यांच्यामार्फत २० ऑगस्ट २०२५ रोजीच्या ‘दैनिक लोकमत समाचार’ मध्ये ‘धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.मात्र,ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किंवा इतर कोणत्याही शासकीय यंत्रणेने प्रकाशित केलेली नाही. ‘धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान’ हा कार्यक्रम शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राबवला जातो.त्यामुळे या कार्यक्रमाच्या नावाचा वापर करून प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीचा कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

