उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे.काल बुधवारी राज्यात भक्तिमय वातावरणात सर्वत्र गणरायाचे आगमन झाले.त्यातच ऐन गणेशोत्सवात पावसाच्या कोसळधारा पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.नुकताच मुंबईच्या मंत्रालय विभागाकडून पुढील २४ तासात चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.काल बुधवारी नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावानजीकच्या शेतशिवारात शेतात काम करीत असतांनाच अंगावर वीज कोसळून आई,मुलगा व एका महिला मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली होती.त्यामुळे शेतात तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
सतर्क राहा; पुढील २४ तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

