Sunday, April 19, 2026
Homeभंडारानाल्याच्या काठावर शौचास बसलेला चिमुकला पडला नाल्यात.. - तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू;...

नाल्याच्या काठावर शौचास बसलेला चिमुकला पडला नाल्यात.. – तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; गावात हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक घटना आज,रविवार २७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.एका तीन वर्षीय चिमुकल्याचा नाल्याजवळ शौच करतांना अचानकपणे पाण्याने तुडूंब भरलेल्या नाल्यात तोल जाऊन दुर्दर्वी मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या कुडेगाव येथे घडली.सुशांत ईश्वर उपरीकर वय ३ वर्षे रा.कुडेगाव,असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्याच्या कुडेगाव येथील ईश्वर उपरीकर यांचे मांदेड कुडेगाव रस्त्यावर नाल्या शेजारी घर असून सकाळी सुशांतला शौचास लागल्याने त्याने आईला सांगितले.त्यानुसार मुलगा सुशांतला नाल्याच्या काठावर शौचास बसवून ती पाणी आणण्यासाठी गेली.नाल्याच्या काठाजवळ बसल्याने सुशांतचा तोल जाऊन तो पाण्यात पडला.नाला तुडुंब भरून असल्याने तो जवळपास २०० मीटर दूर अंतरावर वाहत गेला.यादरम्यान,आईने येऊन बघितले असता,त्या ठिकाणी मुलगा दिसून न आल्याने तिने आरडाओरड केली.आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलाचा नाल्यात मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.यावेळी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार तसेच लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार सह महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून चिमुकल्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!