Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजधानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; चिंताग्रस्त शेतकऱ्यांची उडाली झोप... - संवर्धनाकरिता कृषी अधिकाऱ्याकडून...

धानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; चिंताग्रस्त शेतकऱ्यांची उडाली झोप… – संवर्धनाकरिता कृषी अधिकाऱ्याकडून मार्गदर्शनचा अभाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.सध्या धानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.१२० दिवसांचे धान परिपक्व झाले असून, कापणीला आलेले आहे.तर १४०-४५ दिवसांचे धान अपरिपक्व असल्याने त्या धानावर लष्करी अळीच्या मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.शेतकरी कीटकनाशक फवारणी करून अळीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु,कीटकनाशक फवारणीनेही अळी कमी होतांना दिसून येत नाही.त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना अळी नायनाट करण्याकरिता कोणते कीटकनाशक फवारायचे आहे.धान पीक संवर्धनाकरिता कृषी अधिकाऱ्याकडून कोणतेही मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळत नसून त्यांची खंत गावागावात दिसून येत आहे.शासनाचे विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाच्या संवर्धनाकरिता येणाऱ्या योजना हे अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसून अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
धान लागवडीपासून ते धान निघेपर्यंत शेतकरी लाखो रुपये खर्च करतो.परंतु,ते पैसे परत येतील का? याचा नेम नसतो.आधुनिक युगातही वीज,पाणी उपलब्ध असूनही नैसर्गिक पूर,वादळ,अतिवृष्टीमुळे,धान नष्ट करणारी अळी यामुळे पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांचे शेतीत लावलेले पैसे बुडतात.त्यामुळे शेतकऱ्याचे पीक हे नैसर्गिक लहरीवरच अवलंबून असते. शेतकऱ्यांकरिता शासनाकडून अतिवृष्टी झाली,करपा आला,पूर आला की करा पंचनामे व शेतकऱ्यांना चिरीमिरी मदत करून शेतकऱ्यांची शासनाकडून थट्टा केली जाते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!