Wednesday, May 27, 2026
Homeभंडाराधान खरेदी केंद्र की,धन कमाई केंद्र....- जवळच्या जिल्ह्यातील धान घोटाळा उघड..

धान खरेदी केंद्र की,धन कमाई केंद्र….- जवळच्या जिल्ह्यातील धान घोटाळा उघड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावरील घोटाळ्याची पोलखोल सध्या सुरू आहे.याच श्रृखंलेत लाखांदूर तालुक्यातील पुष्पामृत बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्या.बेलाटी येथे धान खरेदीतील सलग दुसरा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.केंद्रावर शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या एकूण धानापैकी तब्बल ३२४६.४० क्विंटल ९९ लाख ३४ हजार ५९६ रुपये किमतीच्या धानाची अफरातफर करून परस्पर विल्हेवाट लावल्याची बाब तपासात उघड झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून संस्थेच्या अध्यक्षासह संचालक मिळून ८ जणांवर पालांदूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘यांच्यावर’ गुन्हा दाखल 👇

धान घोटाळा प्रकरणात बेलाटी येथील पुष्पामृत बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मनोज अमृत चुटे (४५),संचालक सुखराम धोंडजी बोरिकर (४५),हेमंत नरेंद्र शिवनकर (३५), गोरख नागोजी शिवनकर (४८),प्रफुल्ल विलास नागेश्वर (३० ) सर्व रा.बेलाटी,नितेष लेखराम कुकसे (४६),रूपचंद किसन रोहनकर (५५) दोन्ही रा.पाचगांव अशांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बहुचर्चित धान घोटाळा प्रकरणात जिल्ह्यातील सात धानखरेदी संस्था पणन विभागाच्या रडावरवर होत्या. चौकशीत दोषी आढळल्याने त्यांना धान जमा करण्याची मुदतही देण्यात आली होती. परंतु, अलिकडे धान खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांच्या हिताच्या सोज्वळ नावाखाली धन कमविणाऱ्या संस्था बनल्याचे समोर येत आहे.जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक संस्थांवर घोटाळा प्रकरणात कारवाई झाली आहे.सध्या पणन विभागाने लावलेल्या अटी व शर्तीचा विरोध धानखरेदी संस्थांकडून होत आहे.दरम्यान धानघोटाळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठीच या अटी अधिक तीव्र करण्यात आल्याचे दिसते.

प्रकरण…..👇

लाखांदूर तालुक्यातील बेलाटी येथील पुष्पामृत बहुउद्देशीय सेवा सहकारी अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी खरीप हंगाम सन २०२१-२२ ते रब्बी हंगाम २०२२-२३ या कालावधीत शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजने अंतर्गत जिल्हा मार्केटींग फेडरेशन सोबत धान खरेदी करण्याचा करार केला होता.मात्र,अध्यक्षासह संचालकांनी संगनमताने ७ नोव्हेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत फेडरेशनच्या नियम,अटी व शर्तीचे उल्लंघन केले.आधारभूत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ४८१०.०० क्विटल धान खरेदी केले.त्यापैकी फक्त १५६३.४० क्विंटल धान फेडरेशन (शासनास) उपलब्ध करुन दिले. उर्वरित ३२४६.६० क्विंटल ९९३४५९६ रुपये किमतीचे धान शासनाकडे जमा केले नाही.याबाबत मार्केटिंग फेडरेशनने त्यांना याबाबत वेळोवेळी विचारणा करुन नोटीसही बजावले होते.डी.ओ. देवुनसुद्धा दिलेल्या मुदतीत संस्थेने धान जमा केले नाही.त्यामुळे फेडरेशनद्वारे केलेल्या चौकशीत व तपासात एकूण ३२४६.४० क्विंटल धानाची अफरातफर करून शासनाची व फेडरेशनची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!