उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- सावली तालुक्यातील केरोडा येथे काल दिनांक- २८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी बौद्ध बांधव,उपासक,उपासिका व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत वर्षावास समापण सोहळा संपन्न करण्यात आला.
वर्षावास समापण सोहळ्या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन करतांना रिपब्लिकन पार्टीचे जेष्ठ नेते मनोहर गेडाम यांनी म्हटले की,केरोडा जवळच्या जाम गावात बौद्ध बांधवांच्या लोकवर्गणीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा उभारला परंतु आमचे बौध्द बांधव मात्र भाजप आणि कांग्रेसच्या नेत्यांकडून देणगी घेऊन; बुद्ध मुर्ती दानात घेऊन; विहार बांधत असतांना दिसून येतात.यातच आमचा स्वाभिमान विकल्या जातो.आपल्या कष्टातुन विहार बांधला त्या विहारात खरे धम्माचे कार्य होते.अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी चे जेष्ठ नेते मनोहर गेडाम यांनी केरोडा येथील वर्षावास समापण सोहळ्या प्रसंगी केले.वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदा मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अभारिपचे प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास राऊत,रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, संविधान बचाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर,रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे,सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र पाटिल,उदय गडकरी,किशोर उंदिरवाडे,प्रदिप भैसारे, आदि उपस्थित होते.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत म्हणाले की , आपण बहुजनांनी बौद्ध धम्म स्विकारला म्हणुन आपण एकत्र येवून आपली शक्ती दाखवित आहात. म्हणुन आज आपण सुट-बुटात गाड्या घेऊन फिरतो हे केवळ बौद्ध धम्म स्विकारल्यामुळेच.याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की,आषाढी पौणीमा ते वैशाखी पौणीमा ह्या तिन महिण्याचा कार्यकाळ संपून आज आपण वर्षावास सोहळा करीत आहोत. आजच्या दिवशी भंते यांना कठीण जिवनमय देऊन यांनी आजपासुन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा.उपासकांनी विहारात जावून धम्म ऐकावे.परंतु कोठरीचे भन्ते भगीरण वर्षावास न करता महुला जातात.असेही काही भंते आहेत.अश्या व्यक्ती पासुन आपण सावध राहिले पाहिजे.याप्रसंगी गोपाल रायपूरे, ॲड.विनय बांबोळे,भारतीय बौद्ध महासभेचे नरेंद्र पाटिल यांनीही बौध्द धम्माबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.वर्षावास समापण सोहळ्याच्या कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष गोकुळदास सहारे,कपिल खंडारे, दिलीप ढोलणे,गिरिष ढोलणे,कैलास सहारे,वंदना ढोलणे,गिरिधर सहारे,अनुमाला भैसारे,विजय उंदिरवाडे,कपिल खंडारे सहित बहुसंख्य उपासक, उपासीका प्रामुख्याने उपस्थित होते.रात्रौच्या सुमारास विजय शेन्डे यांच्या भिमगिताचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

