Wednesday, July 8, 2026
Homeचंद्रपूरधक्कादायक..! नियोजित कट रचून पत्नीने केली शिक्षक पतीची हत्या..

धक्कादायक..! नियोजित कट रचून पत्नीने केली शिक्षक पतीची हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील घोडपेठ गावातील कर्मवीर शाळेजवळ दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मृतदेह प्रकरणी धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर आल्याने सर्वजण अवाक् झाले आहेत. एका निर्दयी पत्नीने आपल्याच शिक्षक पतीच्या हत्येची सुपारी देत अपघाताचा बनाव रचला.मात्र,मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालावरून पत्नीने रचलेल्या नियोजित कटाचा भांडाफोड झाला.रविंद्र तुळशीराम कुळमेथे वय ४६ वर्षे,रा.मुधोली चक नं.२,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली असे हत्या प्रकरणातील मृतकाचे नाव असून ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.हत्या प्रकरणी पत्नी दिपमाला रविंद्र कुळमेथे व वर्षा परचाके यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथून,तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली आहे.चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून एमएच ३१ डीसी ८९१९ क्रमांकाची कार आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात  गुन्हा क्रमांक-५५०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (२),१४०(२),६१(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवार २ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ मृतदेह आढळून आला होता.प्रकरणी काही नागरिकांनी याबाबत भद्रावती पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता.दरम्यान,पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सदरचा मृतदेह रविंद्र तुळशीराम कुळमेथे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.अश्यातच रविंद्र यांची पत्नी ही माहेरी वरोरा येथे असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले.इकडे मृतदेहाचा रुग्णालयातून आलेला अहवाल हा गळा आवळल्यामुळे निष्पन्न झाल्याने संशय बळावला. पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली.तसेच तांत्रिक तपासात धक्कादायक बाबी उघड झाल्याने प्लान फसला.यातच भांडाफोड झाला.पतीच्या जाचापायी तिने नागपूर येथील वर्षा परचाके हिच्यासोबत संगनमत करून आणखी दोघांना हाताशी धरून पूर्वनियोजित एक लाख रुपयांची सुपारी दिली व सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांनी रविंद्र यांना घोडपेठ परिसरातील निर्जनस्थळी नेऊन कारमध्येच गळा आवळून हत्या केली.त्यानंतर,मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पळून गेले.प्रकरणी भद्रावती पोलिसांनी हत्येतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक सवेश बेलसरे,संतोष निंभोरकर, भद्रवती पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेन्द्र केदारे,संजय मिश्रा,पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम,सहायक फौजदार महेन्द्र बेसरकर,पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर,जगदीश झाडे,विश्वनाथ चुदरी,धर्मराज मुंडे,पोलीस अंमलदार योगेश घाटोळे,सतोष राठोड, प्रेमकुमार बावनकर,रोहित चिटगिरे,करिश्मा जुनघरी तसेच स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन कुरेकार,नितीन साळवे, प्रमोद कोटनाके,किशोर वैरागडे,पोलीस अंमलदार अमोल सावे,गोपीनाथ नरोटे,शेखर माधनकर,दिनेश अराडे,वृषभ बारसिंगे आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकांचे राज्य स्तरावर प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना,शिक्षक संघटना समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,...

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!