Wednesday, July 8, 2026
Homeगडचिरोलीशंभर टक्के अनुदानावर मिळणार चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन..

शंभर टक्के अनुदानावर मिळणार चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून जमीन विक्रीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,गडचिरोली यांनी यासंदर्भात अधिकृत आवाहन केले आहे.या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीसाठी हक्काची जमीन उपलब्ध करून देणे हा आहे.या अंतर्गत: पात्र कुटुंबाला ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन शासनामार्फत १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. ही जमीन शासन संबंधित जमीन मालकाकडून(विक्रेत्याकडून)खरेदी करून लाभार्थ्यांना प्रदान करते.ज्या शेतकऱ्यांना आपली जमीन या योजनेसाठी विकायची आहे,त्यांनी खालील कागदपत्रांसह आपला प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.जमिनीचा ७/१२ उतारा.जमिनीचा नकाशा.धारण करीत असलेल्या जमिनीचा तपशील(नमुना ८-अ)जमीन मोजणी “क” प्रत.गाव नकाशा.१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र (शपथपत्र).इच्छुक जमीन मालकांनी आपला सविस्तर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,गडचिरोली’ येथे सादर करावा.सदर कार्यवाही शासन निर्णय दिनांक-१४ ऑगस्ट २०१८ नुसार केली जाणार आहे.अधिक माहितीसाठी वरील कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.सचिन मडावी(सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली) यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!