Saturday, May 23, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर एकजण किरकोळ जखमी..

देसाईगंज शहरात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर एकजण किरकोळ जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरात भीषण अपघाताची घटना घडून झालेल्या अपघातात २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला,तर त्याचा सहकारी मित्र किरकोळ जखमी झाल्याची घटना आज,रविवार २८ डिसेंबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावरील हुतात्मा स्मारक जवळ घडली.प्रदीप उर्फ मोंटू हरबा मुंगीकोल्हे वय २७ वर्षे, रा.मेढेंबोडी(वैरागड),ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे,तर त्याचा मित्र विजय देवगडे वय १८ वर्षे असे किरकोळ जखमी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आरमोरी तालुक्याच्या
वैरागड जवळील मेढेंबोडी येथील प्रदीप व त्याचा मित्र विजय हे दोघेही दुचाकीने आज रविवारी रात्रीच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या सावंगी येथे काही कामानिमित्त जात होते.अश्यातच देसाईगंज शहरात येताच शहराच्या मुख्य मार्गावरील हुतात्मा स्मारक जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक बसताच दुचाकीवरील प्रदीप खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.यात तो जागीच गतप्राण झाला.दरम्यान सहकारी मित्र विजय याला किरकोळ जखम झाल्याने त्यास देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासन कळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठवला.घटना घडताच बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३...

..यानंतर सापडल्या; तर ‘मकोका’ अन् मालमत्ता जप्तीची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्हा पोलिस प्रशासनाने चंद्रपूर,वरोरा,चिमूर, ब्रम्हपुरी,मूल,राजुरा आणि गडचांदूर या सर्व पोलीस उपविभागांतील सराईत गो-तस्करांची संपूर्ण माहिती संकलित केली असून जिल्ह्यात तब्बल २९३...

पतीवर बिबट्याने झडप घालताच पत्नी गावाच्या दिशेने पळत सुटली; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शुक्रवारचा दिवस हा हिंस्त्र प्राण्यांच्या मानवाच्या शिकारीचा दिवस होता की काय?कारण की, काल शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात...

शाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात सध्या उष्णतेने कहर केला आहे.राज्यातील अनेक शहरांवर सूर्य आग ओकत असून विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!