Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीखळबळजनक घटना; शौचालयाच्या खड्ड्यात आढळला मृतदेह..

खळबळजनक घटना; शौचालयाच्या खड्ड्यात आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली शहरात आज, रविवार २८ डिसेंबर रोजी चक्क शौचालयाच्या खड्ड्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार,एटापल्ली शहरातील कुणाल तुळशीराम करमरकर यांचे शहरालगत असलेल्या नगर पंचायतच्या मागील भागात नवीन घराचे बांधकाम सुरू आहे.यासाठी घराच्या दुसऱ्या रूममध्ये शौचालयाचा खड्डा तयार करण्यात आला आहे.अश्यातच आज घराचे काम सुरू असल्याने पाहणी दरम्यान शौचालयाच्या खड्ड्यात एका अज्ञात इसमाचा निर्वस्त्र मृतदेह आढळून आल्याने एकच धांदल उडाली.घटनेची माहिती तात्काळ एटापल्ली पोलिसांना देण्यात आली.लागलीच एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.मृतदेहाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.शौचालयाच्या खड्ड्यात आढळून आलेला मृतदेह कुणाचा?मृत्यूचे नेमके कारण काय?असे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे यांनी स्पष्ट केले. घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरात शंका-कुशंका वाढीस लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!