Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरनववर्षाचा आनंद साजरा करतांना अपघात टाळा,नियम पाळा अन् सुरक्षित रहा..

नववर्षाचा आनंद साजरा करतांना अपघात टाळा,नियम पाळा अन् सुरक्षित रहा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दोन दिवसांनी म्हणजेच ३१ डिसेंबरला सर्वत्र नववर्षाची धूम सुरू आहे.सरत्या वर्षाच्या शेवटी मद्यप्राशन करून वाहने सुसाट वेगाने पळवणे, बेदरकारपणे चालविणे,रॅश ड्रायव्हिंग, स्टंटबाजीसारखे प्रकार घडत असून यामुळे गंभीर अपघात व जीवितहानीचे प्रमाण वाढत आहे.या धोकादायक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने कठोर पावले उचलली आहेत.जिल्ह्यात दिनांक- २८ डिसेंबर २०२५ पासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी लावून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.या कालावधीत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
वाहतूक नियंत्रण शाखा,चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ड्रंक अँड ड्राईव्ह,ट्रिपल सीट, रॅश ड्रायव्हिंग व स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान,सर्व नागरिकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे,असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!