Wednesday, June 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहराच्या कन्नमवार वॉर्डात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या..-पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्यात...

देसाईगंज शहराच्या कन्नमवार वॉर्डात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या..-पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी; अन्यथा आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- शहराच्या कन्नमवार वार्डात नगर परिषदेच्या नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.यामुळे वार्डातील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.वॉर्डातील महिला वर्ग व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हा-तान्हात वणवण करीत भटकंती करावी लागत आहे.उन्हा-तान्हात वणवण करीत भटकंती करावी लागू नये; त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी; अन्यथा या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा छेडण्याचा इशारा वार्डातील महिलांनी नगर प्रशासनाला दिला आहे.

देसाईगंज शहराच्या कन्नमवार वार्डात मागील तीन महिण्यापुर्वी सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले.दरम्यान नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने या भागातील पाणीपुरवठा बंद करून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरने करण्यात येत असलेला पाणी पुरवठा एक दिवसाआड करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.दरम्यान याबाबत वॉर्डातील नागरीकांनी नगर प्रशासनाला वारंवार विनंती करून नळ योजना पूर्ववत करण्याची मागणी केली असता; समस्येकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप केल्या जात आहे. विशेष म्हणजे खोदकाम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची तोडफोड करण्यात आल्याने सांडपाणी चक्क रस्त्यावरुन वाहात आहे.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी कुठलिच यंत्रणा उपलब्ध नसल्याने व टँकरने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तत्काळ सोडविण्यात यावी; अन्यथा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वार्डातील महिलांनी नगर प्रशासनाला दिला आहे.

 वॉर्डातील समस्या जाणून घेतांना काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे,युवा नेते लिलाधर भर्रे,मोहित अत्रे तसेच वार्डातील समस्या मांडतांना शकील उईके,गिता शर्मा,नलिना तेलतुंबडे,भिमाबाई सहारे,इंदुबाई सहारे,इंदिराबाई कुंभरे,रोशनी बुराडे,जोत्सना उईके, अल्का पेंदाम,रिना उईके,दिपाली भानारकर,अनिता गोरडवार,सुनिता नागापुरे,मंगला कामतवार,गयाबाई बावणे,संतोषी सयाम,अनिता नागलवाडे,प्रिती बनकर,मंदा कामटे,अल्का ठवकर,मिनाक्षी सोनेकर,विणा ढोक,रोशनी बुराडे,नेहा उके आदी महिला उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!