Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज गजानन महाराज मंदिर परिसरात तान्हा पोळा उत्साहात साजरा.....

देसाईगंज गजानन महाराज मंदिर परिसरात तान्हा पोळा उत्साहात साजरा…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- गजानन महाराज मंदिर परिसरात काल १५ सप्टेंबर २०२३ रोजी आबालवृद्ध समवेत  मान्यवरांच्या उपस्थितीत तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

युवा समिती माता वार्डच्या वतीने गजानन महाराज मंदिर परिसरात तान्हा पोळा निमित्त भव्य वेशभूषा व नंदी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व बालगोपाल यांना भेट वस्तू,नोटबुक्स व प्रसादीचे वाटप करण्यात आले.देसाईगंज येथील कमलाबाई अग्रवाल यांनी सुरू केलेली गेली ५८ वर्षापासूनची परंपरा आजही कायम राखून तान्हा पोळा साजरा करण्यात येत आहे.तान्हा पोळा साजरा करतेवेळी  भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन वानखेडे,माजी नगराध्यक्ष श्याम उइके,विलास लोखंडे,अजय सहारे,मनोहर भुर्रे,दिलीप अग्रवाल,कृष्णा भंडारकर,सुधाकर राऊत,मनोज भूर्रे, नानू मेश्राम,अनिल फडणवीस,चेतन डांबरे,अमोल पत्रे, बादल रहाटे,प्रकाश वानखेडे,गणेश दोनाडकर, आशिस मंगर,ब्रम्हदास आकरे,गणेश बुराडे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच विविध वार्डातील बालगोपाल उपस्थित राहून नंदीबैल आणि वेशभूषा करून गजानन महाराज परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!