- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील घोडा यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या अड्याळ येथे धडकी भरवणारी घटना काल बुधवारी भर दिवसा घडली. अड्याळ येथील एका पेट्रोल पंपा नजिक दुचाकी आणि मिनी ट्रॅव्हल्सची धडक होऊन यात १६ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर १८ वर्षीय युवक गंभीररित्या जखमी झाला.आर्यन सोमेश्वर नैताम वय १६ वर्षे असे अपघातात ठार झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.तर रौनक नरेश राऊत वय १८ वर्षे,दोघेही रा.अड्याळ,ता.पवनी येथील रहिवासी आहेत.
माहितीनुसार,अड्याळ येथील आर्यन आणि रौनक हे दोघेही गावातून आपल्या एमएच ३६ एडी ३४१६ क्रमांकाच्या दुचाकीने पवनी-भंडारा महामार्गावर काही कामानिमित्त आले होते.सदरचा महामार्ग हा अड्याळ गावाला रोड टच आहे.कामे झाल्यानंतर गावात परत जाण्यासाठी निघाले असता तितक्यातच पवनीकडून भंडाराकडे भरधाव वेगात एक मिनी ट्रॅव्हल्स जात होती.त्याचवेळेस दुपारी साडे बारा वाजे सुमारास दुचाकी आणि मिनी ट्रॅव्हल्सची एकमेकांना जोरदार धडक बसली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकीवर बसलेला १६ वर्षीय आर्यन नैताम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर रौनक राऊत गंभीर जखमी झाला.घटना घडली तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत जखमी रौनकला तात्काळ अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचाराकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.सदर प्रकरणाची संपूर्ण चित्रफीत एका पेट्रोल पंपामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.अपघात प्रकरणी अड्याळ पोलिसांनी कलम १७३/२०२५ कलम २८१,१०६ (१),१२५ (ब) भारतीय न्याय संहिता सहकलम १८४ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून ट्रॅव्हल्स चालकाला अटक केली.
- Advertisement -

