Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरधावत्या कारचा टायर फुटल्याने कोलांटउड्या घेत पलटी..

धावत्या कारचा टायर फुटल्याने कोलांटउड्या घेत पलटी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-धावत्या कारचा अचानकपणे टायर फुटला आणि अनियंत्रित झालेली कार रोडवर कोलांटउड्या घेत पलटली.यात कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली-मरारवाडी दरम्यान सकाळच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये कारचालक नंदकिशोर रहांगडाले वय ५५ वर्षे,डॉली नंदकिशोर रहांगडाले वय १७ वर्षे व विजय शरणागत वय ३० वर्षे तिघेही रा.सिवनी,मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत.तिघेही एमपी २२ -सीए ६०७० क्रमांकाच्या कारने सिवनीहून जबलपूर-नागपूर महामार्गाने नागपूरला जात होते.दरम्यान महामार्गावरील चोरबाहुली-मरारवाडी या गावांमध्ये वेगात असलेल्या कारचा समोरचा एक टायर फुटला आणि अनियंत्रित झालेली कार रोडवर कोलांटउड्या घेत उलटली. अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. शिवाय,कारचा अक्षरशः चुराडा झाला.स्थानिक नागरिकांनी अपघाताची पोलिसांना माहिती देत तिघांना जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढले आणि मनसर,ता.रामटेक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे प्रथमोपचार केल्यानंतर तिघांनाही नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. देवलापार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!