Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरदहा दिवसांपासून सरपंच अद्यापही फरारच…-वीज कर्मचाऱ्याला वीजखांबाला बांधण्याचे प्रकरण…

दहा दिवसांपासून सरपंच अद्यापही फरारच…-वीज कर्मचाऱ्याला वीजखांबाला बांधण्याचे प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- महावितरण घुग्घुस कार्यालयांतर्गत नकोडा येथील वीज कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना वीजखांबाला दुपट्टयाने बांधून शिवीगाळ करणारे नकोडाचे सरपंच किरण बांदुरकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.मात्र,१० दिवसांपासून फरार असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.आरोपी सरपंच भाजपचे समर्थक आहेत; हे विशेष.

१५ जून २०२४ रोजी वीज कर्मचारी सूरज परचाके हे कर्तव्यावरून उसगावकडे येत होते.दरम्यान,नकोडाचे सरपंच किरण बांदुरकर व अन्य दोन इसमांनी अडवून परचाके यांना नकोडा गावात आणले.त्यांच्याच दुपट्टयाने वीजखांबाला बांधून शिवीगाळ केली.वीज कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच बांदुरकरविरुद्ध गुन्हा दाखल केला.मात्र,अटकेपूर्वीच फरार झाले.फरार सरपंचाला अटक करण्याच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

दरम्यान,कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केल्याशिवाय कर्तव्यावर रूजू होणार नाही; असा इशारा दिला होता. हे आंदोलन आणखी काही दिवस सुरूच राहील अशी स्थिती निर्माण झाली होती.पोलिस अधीक्षकांनी सरपंचाला अटक करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र, घटनेला १० दिवस होऊनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!