Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीलाकडी दांड्याने जबर मारहाण करून ठार करणाऱ्या मायलेकाला जन्मठेप…

लाकडी दांड्याने जबर मारहाण करून ठार करणाऱ्या मायलेकाला जन्मठेप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- फिर्यादीच्या भावाला लाकडी दांड्याने जबर मारहाण करून ठार करणाऱ्या मायलेकाला गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास एस.कुलकर्णी यांनी मंगळवारी दि.२५ ला जन्मठेप व ६ हजार द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.समीर दिलीप कुमरे वय २१ वर्षे व बारुबाई उर्फ अनिता दिलीप कुमरे वय ४० वर्षे दोन्ही रा. पावीमुरांडा ता.चामोर्शी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी देवराव कानू कुमरे हा वय ५० वर्षे रा.पावीमुरांडा याचा भाऊ दिलीप कानू कुमरे वय ४५ वर्षे हा त्याची पत्नी बारुबाई व मुलगा समीर यांच्यासोबत वास्तव्य करतात. दिनांक-२० ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी समीर कुमरे हा बांधकाम मजुरीत्या कामासाठी घोटजवळील मंजेगाव येथे गेला  होता.२१ ऑगस्ट रोजी फिर्यादीचा भाऊ दिलीप याची प्रकृती बरी नसल्याने तो उपचारासाठी गडचिरोली येथून उपचार घेऊन घरी परतला.तेव्हा तो दारु पिऊन

होता.घरी आल्यानंतर त्याने आरोपी पत्नी बारुबाई हिच्यासोबत भांडण करून मारहाण केली.त्यामुळे पत्नीने आपल्या मुलाला फोनवरून ही माहिती दिली. समीर हा २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता घोटवरून एसटी बसने घरी आला.फिर्यादी बँकेच्या कामानिमित्त तळोधी येथे निघून गेला.बँकेचे काम आटोपून घरी परत आला तेव्हा,फिर्यादीच्या भावाच्या घराशेजारील राहणारे किसन पत्रू उईके,संपत जयराम पेंदाम,जीवन उष्ट्र पेंदोर यांनी फिर्यादीला सांगितले की, तुझा पुतण्या समीर व भावसून बारुबाई यांनी तुझ्या भावाशी भांडण करून लाकडी दांड्याने जबर मारहाण करून ठार केल्याची माहिती दिली. फिर्यादीने याबाबत चामोर्शी पोस्टे येथे तक्रार दाखल केली.पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी समीर कुमरे यास अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.कलम ३०२ भादंवि अन्वये दोषी ग्राह्य धरून जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!