Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीसामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना प्रति जोडपे २५ हजार...

सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना प्रति जोडपे २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना आर्थिक आधार देण्यासाठी “सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना” राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पात्र मागासवर्गीय दाम्पत्यांना प्रति जोडपे २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती,नवबौद्ध,विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील पात्र दांपत्यांना या योजनेचा लाभ मिळतो. तसेच सेवाभावी संस्था,शासकीय प्राधिकरणे अथवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यांच्या आयोजनासाठी प्रति पात्र जोडपे ४ हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. नवदांपत्यातील वधू किंवा वर यापैकी किमान एक जण मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.तसेच हा विवाह दोघांचाही प्रथम विवाह असावा.बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेला नसावा.याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.लाभार्थी दाम्पत्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक आहे.
सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा यंत्रणा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम व संबंधित नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.अशा संस्था सेवाभावी स्वरूपाच्या असाव्यात.सामूहिक विवाह सोहळ्यात किमान १० दांपत्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था अथवा यंत्रणांनी सहभागी मागासवर्गीय दांपत्यांची माहिती,छायाचित्रे, अर्ज व आवश्यक कागदपत्रे विवाह सोहळा होण्याच्या किमान १५ दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांच्या कार्यालयात सादर करावीत.
सदर योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र दांपत्यांना मिळावा तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या सेवाभावी संस्था,शासकीय व सार्वजनिक प्राधिकरणांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.सचिन मडावी,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.योजनेबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!