Friday, August 7, 2026
Homeगडचिरोलीकोरची,कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी व गडचिरोलीत रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन.. - १७ हजार ते २३...

कोरची,कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी व गडचिरोलीत रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन.. – १७ हजार ते २३ हजार रुपयांपर्यंत राहणार वेतन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेकडून येत्या,२९ जून  ते ३ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत कोरची,कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी व गडचिरोली या पाच तालुक्यातील पंचायत कार्यालयाच्या सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.सदर रोजगार भरती मेळाव्यामध्ये सिक्युरिटी अँड इंटेलिजेंस सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड गोंदिया(Security and Intelligence Services India Limited Gondiya)या संस्थेकडून सिक्युरिटी गार्ड व सिक्युरिटी सुपरवायजर या पदांकरीता उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे.सदर पदांचे वेतन १७ हजार ते २३ हजार रुपयांपर्यंत राहणार असून सदर पदांकरीता गडचिरोली जिल्ह्यातील १९ ते ४० वयोगटातील सर्व ईच्छूक बेरोजगार उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र,(१० वी पास/नापास,१२ वी, पदवी पदविधर)गुणपत्रक,आधार कार्ड,मतदान ओळखपत्र,बॅक पासबुक(मुळ व झेराक्स ),पोलीस व्हेरीफीकेशन, फोटो-६,डॉक्टर कडून मेडीकल फिटनेस प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रासोबत स्व:खर्चाने सकाळी १०.३० ते ४.३० वाजेपर्यंत पुढील नियोजित तारखेनूसार दिलेल्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केली आहे.अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-२ युनिट क्रं २,कॉम्प्लेक्स,गडचिरोली या कार्यालयाशी  8291589986/8788257016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.असे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी कळविले आहे.
  •   रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे👇
  •  २९ जून २०२६ रोजी कोरची,पंचायत समिती, सभागृह कोरची येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
  • ३० जून २०२६ रोजी कुरखेडा,पंचायत समिती,सभागृह,कुरखेडा येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
  • १ जुलै २०२६ रोजी,देसाईगंज(वडसा)पंचायत समिती,सभागृह,वडसा येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
  • २ जुलै २०२६ रोजी,आरमोरी पंचायत समिती, सभागृह,आरमोरी येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
  • ३ जुलै २०२६ रोजी,गडचिरोली,पंचायत समिती, सभागृह,गडचिरोली येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

मराठी भाषा विभागाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित.. – नागरिक,विद्यार्थी व संशोधकांनी नवीन संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागासह त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या एकूण सात संकेतस्थळांचे महाआयटी मार्फत नवीन डोमेनवर यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे.शासनाच्या धोरणानुसार...

रेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? मका दळून मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली(रेशन)अंतर्गत गव्हासोबत किंवा काही प्रमाणात गव्हाऐवजी मक्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र,या...

‘त्या’ वाघासाठी आठ ट्रॅप कॅमेरे व दोन अत्याधुनिक लाइव्ह कॅमेऱ्यांद्वारे डिजिटल नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात तीन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून ५५ वर्षीय शेतकरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!