Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूर'ते' दोन मारेकरी निघाले शासकीय कर्मचारी.. - बार मधील पोलीस शिपाई हत्या...

‘ते’ दोन मारेकरी निघाले शासकीय कर्मचारी.. – बार मधील पोलीस शिपाई हत्या प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहरातील पिंक बारमध्ये वाद सोडविण्याठी गेलेल्या दिलीप चव्हाण व समीर चापले या दोन पोलिस शिपायांवर शुक्रवारी ७ मार्चला चाकू हल्ला झाला होता.यात दिलीप चव्हाणचा मृत्यू झाला,तर समीर चापले जखमी झाला होता.शहर पोलिसांनी अक्षय ऊर्फ आकाश संजू शिर्के,यश अनिल समूद वय २७ वर्षे,दोघेही रा.दादमहल वॉर्ड,चंद्रपूर तर नितेश हनुमान जाधव वय २९ वर्षे,रा.समाधी वॉर्ड,चंद्रपूर या तिघांना अटक केली होती.यश समूदवर यापूर्वी ३२४ चा गुन्हा दाखल होता तर आकाश व नितेशची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.त्यातच ७ मार्च रोजी क्षुल्लक रागातून हल्ला केला होता.घटनेच्या दिवशीच तासाभरातच शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या चमूने तिन्ही आरोपींना अटक केली होती.त्यातच आता मोठी माहिती समोर आली आहे.पोलिस शिपायाच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी शासकीय कर्मचारी निघाले असून आकाश ऊर्फ अक्षय शिर्के हा सिंदेवाही रुग्णालयात,तर यश समूद हा भद्रावती आदिवासी विभागाच्या वसतिगृहात स्वच्छता कर्मचारी आहे. विशेष म्हणजे,आकाशच्या आईने २० वर्षे नोकरी करून व्हीआरएस घेतल्याने तिच्या ठिकाणी आकाश नोकरीवर लागला होता.काल सोमवारी तिन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपताच तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!