Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आणि आमदारांच्या तक्रारीनंतर वेगवान घडामोडी... - जिल्हा खनिकर्म अधिकारी...

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आणि आमदारांच्या तक्रारीनंतर वेगवान घडामोडी… – जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे हटाव मोहीम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १६२ कोटी रुपयांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार कामांना मान्यता देण्यात आली नसल्याचा ठपका ठेवत स्थगिती देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.बैठकीस गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे यांच्याविरुध्द राज्याच्या खनिकर्म विभागाकडे अहवाल पाठविला होता.मुख्यत्वे,जिल्हा खनिज निधीतून खनिज उत्खनन होत असलेल्या प्रभावित गावांमध्येच पायाभूत सुविधांची कामे करणे अनिवार्य आहे.पण,या नियमाला सोयीस्कर बगल देत खनिज निधी बिगर प्रभावित गावांमध्ये वळविण्यात आला होता.ही बाब निदर्शनास आल्यानंतर नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावर आक्षेप घेतला.दरम्यान,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनीदेखील जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली होती.अधिवेशन कालावधीत डॉ.नरोटे यांनी खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार केली होती.जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल व डॉ.नरोटेंच्या तक्रारीनंतर वेगाने घडामोडी घडल्या व बरडे यांना हटविण्यात आले.अखेर काल,सोमवारी १० मार्च रोजी बरडे यांच्याकडील पदभार काढून घेण्याचे आदेश राज्याच्या खनिकर्म विभागाकडून आले.त्यामुळे उमेश बरडे यांना हटविण्यात आले असून,त्यांच्याकडील पदभार नागपूर येथील खनिकर्म अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!