- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शहरातील पिंक बारमध्ये वाद सोडविण्याठी गेलेल्या दिलीप चव्हाण व समीर चापले या दोन पोलिस शिपायांवर शुक्रवारी ७ मार्चला चाकू हल्ला झाला होता.यात दिलीप चव्हाणचा मृत्यू झाला,तर समीर चापले जखमी झाला होता.शहर पोलिसांनी अक्षय ऊर्फ आकाश संजू शिर्के,यश अनिल समूद वय २७ वर्षे,दोघेही रा.दादमहल वॉर्ड,चंद्रपूर तर नितेश हनुमान जाधव वय २९ वर्षे,रा.समाधी वॉर्ड,चंद्रपूर या तिघांना अटक केली होती.यश समूदवर यापूर्वी ३२४ चा गुन्हा दाखल होता तर आकाश व नितेशची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.त्यातच ७ मार्च रोजी क्षुल्लक रागातून हल्ला केला होता.घटनेच्या दिवशीच तासाभरातच शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या चमूने तिन्ही आरोपींना अटक केली होती.त्यातच आता मोठी माहिती समोर आली आहे.पोलिस शिपायाच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी शासकीय कर्मचारी निघाले असून आकाश ऊर्फ अक्षय शिर्के हा सिंदेवाही रुग्णालयात,तर यश समूद हा भद्रावती आदिवासी विभागाच्या वसतिगृहात स्वच्छता कर्मचारी आहे. विशेष म्हणजे,आकाशच्या आईने २० वर्षे नोकरी करून व्हीआरएस घेतल्याने तिच्या ठिकाणी आकाश नोकरीवर लागला होता.काल सोमवारी तिन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपताच तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
- Advertisement -

