Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीती' आत्महत्या नसून हत्याच; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आझाद समाज पार्टी...

ती’ आत्महत्या नसून हत्याच; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आझाद समाज पार्टी -आरमोरी तालुक्यातील विष प्राशन प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-मारहाणीमुळे तणावात गेलेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन केल्याने  उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ५ ऑक्टोंबरच्या सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शिवानी फकीरदास कोवे वय १७ वर्षे,रा.कुकडी, ता.आरमोरी असे मृत मुलीचे नाव आहे.
विहीरगाव येथील चिकन सेंटर चालवत असलेल्या प्रशांत भोयर या दोन अपत्य असलेल्या व्यक्तीबरोबर शिवानीचे प्रेम प्रकरणाच्या संशयातून प्रशांतची पत्नी शिल्पा भोयर,आई कल्पना विश्वनाथ भोयर,वहिनी अरुणा प्रफुल भोयर यांनी गुरुवारी ३ ऑक्टोंबरला दुपारी २ वाजताच्या समारास शिवानीच्या घरी जाऊन भांडण केले.तिला खोलीत डांबून मारहाण केली. त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने विष प्राशन केले.प्रकरणामुळे शिवानीने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्येचे पाऊल उचलले.ही आत्महत्या नसून हत्याच आहे; त्यामुळे मारहाण करणाऱ्या दोषींवर मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा  दाखल करावा तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कुठल्याही राजकीय दबावात न येता युवतीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा; अशी मागणी गडचिरोलीसह आरमोरी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली.
आदिवासीच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही समाजाच्या मुलीवर अन्याय होत असेल तर आझाद समाज पार्टीच्या वतीने अन्याया विरोधात आवाज उठवून संघर्ष करणार,असे आझाद समाज पार्टी गडचिरोलीचे कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी सांगितले.यावेळी पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड,जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके , आरमोरी विधानसभाध्यक्ष ऋषी सहारे,जिल्हा सचिव दिनेश बनकर,गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले,आरमोरी तालूका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, युवा आघाडी प्रमुख शुभम पाटील,उपाध्यक्ष पियुष वाकडे,शहराध्यक्ष नितीन भोवते,मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार व पीडिताचे आई-वडील उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!