Monday, August 24, 2026
Homeआरमोरीठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. - आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी हातउसनवारी करून तर काहींनी कर्ज काढून शेतात पीक घेतले,मात्र क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू तरळले.प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून शेतकरी बांधवांना धीर देत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तसेच संबंधित प्रशासनाला त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या सूचना दिल्या.
ठाणेगाव परिसरात लागलेल्या वनव्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका तसेच जमा करून ठेवलेले मक्याचे पुंजने आगीत जळून खाक झालेत.यासोबतच शेतातील मोटार पंप,पाईप,विजेची डीपी तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही आगीत जळून भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.परिसरातील भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले असून आंब्याची झाडे जळून खाक झाली. झाडांना लागलेली आंब्याची फळे सुद्धा आगीत जळाली. यासोबतच फणसाची झाडे व झाडांना लागलेले फणसेही जळून नुकसान झाले आहे.क्षणातच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या सर्व नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी संबंधित क्षेत्रातील तलाठी कात्रटवार यांना सोबत घेऊन शेतशिवारात फिरून केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सांत्वन केले व शासनाकडे नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे
आश्वासन दिले.
यावेळी आरमोरी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, राजू सामृतवार,तलाठी कात्रटवार,विनोद बारस्कर,किशोर तोरणकर,हरिदास भुरसे,विकी जूआरे,कैलास भुरसे,मंगेश जूआरे,संजय बारस्कर,ओमप्रकाश बारस्कर,सिकंदर नंदधने,जितेंद्र सोनटक्के,विजय कत्रे,अक्षय लोथे,भूषण चिचगरे,गीतेश उपरीकर,नाशिक भुरसे,अमर उपरीकर, आकाश खोब्रागडे,अजय नारनवरे,प्रफुल नारनवरे,रोशन लक्षणे,अंशीक लोणारे,प्रज्वल प्रधान,प्रज्वल नैताम, जगदीश लक्षणे,ईशांत लढे, निकेश नंदधने,सुमित नंदधने तसेच परिसरातील नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!