- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-पाऊस असल्याने शेताकडे जाण्यासाठी
घराच्या अंगणात असलेल्या टिनाजवळील छत्री काढण्यासाठी गेलेल्या मोठा भावाला विजेचा धक्का बसला.त्यामुळे लहान भावाने धाव घेत छत्री हातात घेतली असता विद्युत प्रवाहाच्या स्पर्शात चिकटून राहिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात काल,बुधवार ९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली.यात नंदकिशोर राधेश्याम साखरवाडे वय ४४ वर्षे रा.मोहगाव देवी,ता.मोहाडी यांचा जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार,सकाळी साडे नऊ च्या सुमारास मोठा भाऊ रविचंद्र साखरवाडे हा शेताकडे जाण्यास निघाला होता.त्यामुळे त्याने घराच्या अंगणात असलेल्या टिनाजवळील छत्री काढण्यासाठी हात पुढे केला.पावसामुळे घरासमोर लावलेले टिनाचे पत्रे ओले होते.त्याच ठिकाणाहून इलेक्ट्रिक वायर गेल्याने कुठून तरी वायर कापला असावा व टिनामध्ये विद्युत प्रवाह संचारला असावा.याच टिनाच्या खालच्या भागाला छत्री ठेवली होती.त्यामुळे छत्रिला हात लावताच मोठ्या भावाला विजेच्या धक्का बसला.हे दृश्य पाहून त्याचा लहान भाऊ नंदकिशोर साखरवाडे धावून गेला.नंदकिशोर छत्रीला आलेल्या विद्युत प्रवाहाला पकडून राहिला. त्यामुळे त्यांचे वडील राधेश्याम यांनी नंदकिशोरकडे धाव घेतली.त्यावेळी वडिलांनाही विद्युत प्रवाहने फेकून दिले.यावेळी वडिलांना करंट लागल्याचे पाहताच त्यांचा मुलगा ऋषभ याने तात्काळ विद्युत प्रवाह बंद केला.तोवर उशीर झाला होता.मोठ्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात लहान भावाचा जीव गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
- Advertisement -

