Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद असलेले मार्ग..

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद असलेले मार्ग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात पावसाने काहीकाळ विश्रांती घेत आता नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यास आपले लक्ष केल्याचे दिसून येत आहे.काल बुधवारी नागपुरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.आज गुरुवार चंद्रपूर जिल्ह्यास ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.जोरदार पाऊस दुसऱ्या भागात जरी कोसळला असला तरीही नदी,नाल्यातील पाण्याचा प्रवाह निर्माण होऊन आपल्या भागात पुरसदृश्य परिस्थिती तयार होत असते.त्यामुळेच मार्ग बंद पडू लागतात.अश्याच प्रकारे आज,गुरुवार १० जुलै रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील १६ मार्ग पुरामुळे अद्यापही बंद असल्याने पुलावरून पाणी वाहत असतांना रस्ता ओलांडू नये,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
  • पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
  • गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
  •  गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (गोविदपुर नाला,शिवणी नाला)
  •  आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ३५२ सी (दिना नदी)
  • तळोधी आमगाव रेगडी देवदा रस्ता राज्यमार्ग ३८१ (पोहार नदी)
  • अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला) तालुका अहेरी
  • हरनघाट चामोर्शी रस्ता राज्यमार्ग ३७० (दोडकुली,दहेगाव नाला)
  •  चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
  •  अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
  • भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
  •  वडसा वळण मार्ग  प्रजिमा ४१ तालुका देसाईगंज
  •  आरमोरी जोगीसाखरा शंकरनगर रस्ता प्रजिमा ४८ तालुका आरमोरी (गाढवी नदी)
  •  चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा ३७ तालुका चामोर्शी
  •  खरपुंडी दिभना बोदली रस्ता प्रजिमा ४४ तालुका गडचिरोली
  • आरमोरी अरसोडा रस्ता प्रजिमा ४७ तालुका आरमोरी
  •  वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,५५ तालुका चामोर्शी
  •  वाघाळा सायगाव शिवणी रस्ता प्रजिमा ३४ तालुका आरमोरी
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!