Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोलीमोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. - पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे “Extremely Severe Alert” म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर सूचना म्हणून प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आज,मंगळवार २६ मे रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी प्राप्त झालेल्या संदेशात “पुढील २४ तासांत अमरावती,चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,वर्धा या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी रात्र उष्ण राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.गेल्या आठवडाभरापासून सूर्यदेव विदर्भावर कोपल्याचे चित्र आहे.११ पैकी ९ जिल्ह्यांतील नागरिक उष्ण लाटेचा सामना करीत असून उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पुढे आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरीत काल सोमवारी पारा ०.४ अंशाने वाढून ४७.६ अंशावर पोहोचला असून सलग दुसऱ्याही दिवशी हे शहर देशात सर्वात तापदायक ठरले आहे.  नागपूर व इतर पाच जिल्ह्यांत दिवसाचे तापमान ४६ अंशाच्यावर नोंदविण्यात आले.सोमवारी नागपूरचा पारा १.१ अंशाने वाढून थेट ४६.५ अंशावर उसळला असून ब्रम्हपुरीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे.याशिवाय भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा शहरांचे तापमानही एकपेक्षा अधिक अंशाने वाढून ४६ अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात आले आहे.दुसरीकडे अकोला, अमरावतीचा ४५ अंशाच्यावर आणि यवतमाळ ४४.४ अंशावर असून उष्ण लाटेच्या प्रभावात आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये,पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!