Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने लागू झालेल्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसून,कर्जमाफी हा सरकारचा पूर्वनियोजित आणि धोरणात्मक निर्णय असल्याने या प्रक्रियेत आचारसंहितेचा कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही व येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील बळीराजासाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल,असे स्पष्ट केले होते.त्यानुसार,केंद्रीय निवडणूक आयोगाने शेतकरी कर्जमाफी योजनेस हिरवा कंदील दिल्याने येत्या ३० जूनपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीक कर्ज आहे,त्यांना २ लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली होती.मात्र,सध्या महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे.त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा निर्णय या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता होती व कर्जमाफीचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.अश्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राबवण्यास मंजुरी दिल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!