Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोली​अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.. -दोन वेगवेगळ्या छाप्यात...

​अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.. -दोन वेगवेगळ्या छाप्यात ५ आरोपींवर गुन्हे दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेश मेश्राम व पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेरकी यांच्या पथकाने पारडी फाटा रोडवर दोन वेगवेगळ्या कारवाया करत बेकायदेशीररित्या विनापरवाना देशी-विदेशी दारू आणि बिअरची वाहतूक करणाऱ्या ४ आरोपींना रंगेहात अटक केली आहे.या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,एकूण ५ आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • ​पहिली कारवाई: मुडझा येथील दोन आरोपी गजाआड,मुख्य आरोपी फरार👇
​गडचिरोली पोलीस पथक पेट्रोलिंगवर असतांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा-पारडी फाटा रोडवर सापळा रचला.यावेळी निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या एमएच ३३ एजे ०४७० आणि एम एच ३३ एएच ५८८० क्रमांकाच्या सुझुकी एक्सेस दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक करतांना विकास कवडु मेश्राम वय २६ वर्षे आणि अतुल दिवाकर मेश्राम वय २६ वर्षे, दोन्ही रा.मुडझा, जि.गडचिरोली यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रॉकेट देशी दारू संत्रा आणि रॉयल स्टॅग कंपनीच्या दारूच्या एकूण १४८ निपा(क्वार्टर)आणि दोन दुचाकींसह एकूण १ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस चौकशीदरम्यान हा दारूचा साठा सोनू व्यंकटेश गड्डमवार रा.मुडझा याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाल्याने,त्याच्यासह तिन्ही आरोपींवर कलम ६५(अ)महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मुख्य आरोपी सोनू गड्डमवार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
  • ​दुसरी कारवाई: चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तस्करांना अटक👇
​काही वेळाने पारडी फाटा मार्गावर पोलिसांनी दुसरी यशस्वी कारवाई केली.सुझुकी एक्सेस दुचाकी (क्र.एमएच ३३ सीपी ९९१०)आणि एका विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या एक्सेस गाडीवरून (चेसीस क्र.एमबी८डीपी ११एजे८९५४७६०)दारूची वाहतूक करणाऱ्या रितीक जितेंद्र पिपरे वय २३ वर्षे व मुकेश मुर्लीधर रोहनकर वय २७ वर्षे,दोन्ही रा.वाघोली, ता.सावली,जि.चंद्रपूर यांना पोलिसांनी अडवून अटक केली.​त्यांच्या ताब्यातून २०० नग रॉकेट देशी दारू संत्रा,तसेच हायवर्ड आणि बडवायझर मॅग्नम कंपनीचे एकूण ४८ बिअरचे टीन आणि दोन दुचाकींसह एकूण १ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दोन्ही आरोपींविरुद्ध देखील गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • ​अवैध दारू विक्रेत्यांचे दणाणले धाबे👇
​सदर यशस्वी आणि कौतुकास्पद कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे पो.कॉ.नरेश मेश्राम आणि पो.कॉ. नितीन शेरकी यांच्या पथकाने पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.पोलिसांच्या या लागोपाठ झालेल्या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध दारू माफिया आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहील,असा इशारा गडचिरोली पोलिसांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा आज,मंगळवार २६ मे...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी.. – वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे...

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!