- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे ३३ पैकी ३३ गेट उघडण्यात आले आहेत.त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.अश्यातच दोन दिवसांपासून ब्रम्हपुरी तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे.त्यातच उद्या,गुरुवार १० जुलै रोजी भारतीय हवामान खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आल्याने अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक वाढण्याची शक्यता असल्याने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ३० (२) (५) व (१८) अन्वये उद्या,गुरुवार १० जुलै रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.आदेशानुसार,सर्व अंगणवाड्या,पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच खाजगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तथापि,आदेशाचा फायदा केवळ ब्रम्हपुरी तालुक्यातील संस्थांनाच होणार असून इतर तालुक्यांतील शाळा,महाविद्यालये यासाठी लागू राहणार नाही.सुट्टी असली तरी,सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे,अशाही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- Advertisement -

