- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामानिमित्त गेलेल्या एका सर्वसामान्य महिलेशी तेथील कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाने दखल घेत शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सन्मानपूर्वक व संयमाने वागणे ही प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याची मूलभूत जबाबदारी आहे.त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही; असे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष बैठक बोलावून नागरिकांशी संवाद साधतांना शिष्टाचार,संवेदनशीलता व प्रशासनाची प्रतिमा जपण्याबाबत सूचना देत प्रकरणाशिसंबंधित कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून प्राप्त खुलाशानुसार पुढील प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी म्हटले आहे.
- व्हायरल व्हिडिओ(सोर्स सोशल मीडिया)👇
- Advertisement -

