Sunday, October 25, 2026
Homeचंद्रपूरचारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

चारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना आज ७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील झरण गावाजवळ घडली आहे.

सदर घटना झरण गावाच्या अगदी जवळ घडली असून जंगल परिसरातून बिबट्या रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाची बिबट्याला जोरदार धडक बसली.जोरदार धडक बसताच बिबट्या जागीच ठार झाला.सदर घटनेची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचे अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.त्यामुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!