Tuesday, June 23, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर गोळीबार प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी नऊ पोलिस पथके गठीत…

चंद्रपूर गोळीबार प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी नऊ पोलिस पथके गठीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील गोळीबारप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. सर्वांचे इन कॅमेरा बयाण नोंदविण्यात आले.या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी नऊ पोलिस पथके गठीत करण्यात आली आहेत.आता हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते.गोळी झाडणारा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.सुरज बहुरिया हत्याकांड कोळसा चोरीतून गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

गुरुवारी भरदुपारी एका अज्ञात इसमाने मनसे कामगारसेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली.गोळी पाठीत घुसल्याने अंधेवार जखमी झाले होते.चंद्रपूर शहर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा करीत सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते.त्या आधारावर शहर पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९,६१, (१), तसेच आर्म ॲक्ट ३,२५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वातील चमूने शुक्रवारी दुपारपर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असले,तरी कुणालाही अटक केली नसल्याची माहिती आहे.

संशयितांची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत.या प्रकरणात जखमी झालेल्या अमन अंधेवार यांच्या पाठीतून नागपूर येथे शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आल्याची माहित पोलिसांनी दिली.अमनची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

चंद्रपुरात गोळीबार करण्यात आलेला शूटर हा बाहेरून बोलविला असावा,असा अंदाज सीसीटीव्ही फुटेजवरून चंद्रपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्या आधारावर तपास सुरू केला आहे.या गोळीबारामागे बहुरिया हत्याकांड,अवैध कोळसा वाहतूक तसेच मनसे कामगार सेनेच्या अध्यक्षपदात केलेला बदल या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!