Thursday, October 22, 2026
Homeआरमोरीगणेशोत्सव,ईदच्या निमित्ताने शांतता राखण्याचे आवाहन- आरमोरी पोलीस प्रशासन

गणेशोत्सव,ईदच्या निमित्ताने शांतता राखण्याचे आवाहन- आरमोरी पोलीस प्रशासन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-राज्यात कालपासून गणेश उत्सवास प्रारंभ झाला असून अनेक सार्वजनिक  मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे.विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाल्याने भाविक भक्तांची मांदियाळी अनेक ठिकाणी पहावयास मिळते.अशातच आरमोरी शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.त्यामुळे उत्सव साजरा करतेवेळी कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये तसेच शांतता भंग होऊ नये; यासाठी गणेशोत्सव व येणाऱ्या ईदच्या निमित्ताने आरमोरी पोलिस व होमगार्ड विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.रूट मार्च प्रसंगी पोलिस प्रशासनाने सणोत्सव काळात आरमोरीकरांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
प्रसंगी रूट मार्च काढण्यात आला.सदर रूट मार्च आरमोरी ठाण्यातून निघून इंदिरा गांधी चौक,गुजरी चौक,जामा मस्जिद,श्रीराम मंदिर चौक,दुर्गा मंदिर चौक,विठ्ठल मंदिर चौक,शिवाजी चौक,पटेल चौक, गायकवाड चौक,सुभाष चौक तसेच इंदिरा गांधी चौका पर्यंत सांगता करण्यात आली.शहरात तसेच तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गावात कोणताच अनुचित प्रकार घडू नये; यासाठी आरमोरी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वामध्ये रूट मार्च काढण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे,विजय चलाख,सहायक फौजदार मोरेश्वर गौरकर,हवालदार विशाल केदार,विलास कुमरे, हवालदार आनंदराव कुकडकर,होमगार्ड उपपथक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी अनिल सोमनकर यांच्यासह पोलिस व होमगार्ड सहभागी झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!