Monday, July 13, 2026
Homeनागपूरराजकारणी जसे बोलतो,तसे करत नाही; लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असं वाटतं.....

राजकारणी जसे बोलतो,तसे करत नाही; लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असं वाटतं.. – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- ‘निवडणुकीत एक गाणं तयार केलं.त्या
गाण्याच्या रॉयल्टी म्हणून ८५ हजार रुपये मिळाले. चांगलं काम करा. काम केल्यानंतर कोणालाच कळलं नाही पाहिजे, असं केंद्रीय नितीन गडकरी म्हणाले.ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटनाला हजेरी लावली.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांशी बोलताना राजकारण्यांचे कान टोचले. नितीन गडकरी म्हणाले, ‘राजकारणी जसे बोलतो, तसे करत नाही.त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असं वाटतं.काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत’.लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार बोललो, जातपात पाळत नाही.मला मत द्या किंवा नका देऊ.जो म्हणणार जात,त्याला बसणार लाथ असंही बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला.समाजात अज्ञान अंधश्रद्धा,असमानता,स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केलं पाहिजे; असे ते म्हणाले.पैसा हे साधन आहे; पण साध्य नाही.माझा निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले.ते गाणे युट्यूबवर टाकले.ते गाणे ९० लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्यापोटी रॉयल्टी म्हणून ८५ हजार रुपये मला आणून दिले.चांगलं काम करा,आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळलं नाही पाहिजे,पण आजकाल १० रुपये देऊन चौकात १० फोटो लावणारे आहेत; असे म्हणत टोला हाणला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!