- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-राज्यात कालपासून गणेश उत्सवास प्रारंभ झाला असून अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे.विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाल्याने भाविक भक्तांची मांदियाळी अनेक ठिकाणी पहावयास मिळते.अशातच आरमोरी शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.त्यामुळे उत्सव साजरा करतेवेळी कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये तसेच शांतता भंग होऊ नये; यासाठी गणेशोत्सव व येणाऱ्या ईदच्या निमित्ताने आरमोरी पोलिस व होमगार्ड विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.रूट मार्च प्रसंगी पोलिस प्रशासनाने सणोत्सव काळात आरमोरीकरांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
प्रसंगी रूट मार्च काढण्यात आला.सदर रूट मार्च आरमोरी ठाण्यातून निघून इंदिरा गांधी चौक,गुजरी चौक,जामा मस्जिद,श्रीराम मंदिर चौक,दुर्गा मंदिर चौक,विठ्ठल मंदिर चौक,शिवाजी चौक,पटेल चौक, गायकवाड चौक,सुभाष चौक तसेच इंदिरा गांधी चौका पर्यंत सांगता करण्यात आली.शहरात तसेच तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गावात कोणताच अनुचित प्रकार घडू नये; यासाठी आरमोरी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वामध्ये रूट मार्च काढण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे,विजय चलाख,सहायक फौजदार मोरेश्वर गौरकर,हवालदार विशाल केदार,विलास कुमरे, हवालदार आनंदराव कुकडकर,होमगार्ड उपपथक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी अनिल सोमनकर यांच्यासह पोलिस व होमगार्ड सहभागी झाले होते.
- Advertisement -

