Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरकोतवालाचे अपहरण करून हत्या; तिघांना अटक..

कोतवालाचे अपहरण करून हत्या; तिघांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे यांचा मृतदेह काल,रविवारी सडलेल्या अवस्थेत उमा नदीच्या तिरावर आढळला.शेतीच्या वादातून त्यांचे अपहरण करून कट करून हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी नामदेव धनविजय,धनविजय यांचे मानसपुत्र सोपान जिल्हारे समुद्रपूर,प्रशांत कुंभरे याला अटक केली आहे.सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे हे १२ सप्टेंबरपासून बेपत्ता होते.१३ सप्टेंबरला त्यांचे भाऊ संजय खोब्रागडे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती.तेव्हापासून ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वातील चमू नंदकिशोर खोब्रागडे यांचा शोध घेत होती.दरम्यान,रविवारी सकाळी १०:३० वाजता कुजलेल्या अवस्थेत नंदकिशोरचा मृतदेहच आढळला.पोलिसांनी नामदेव धनविजय,सोपान जिल्हारे,प्रशांत कुंभरे यांना अटक केली.फरार आरोपीचा शोध सुरू आहे.ही कारवाई उपविभागीय पोलिस निरीक्षक दिनकर ठोंबरे,पोलिस निरीक्षक विजय राठोड,सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश मेश्राम,दर्शन लाटकर आदींनी केली.
सन २०१७ ला धनविजय यांनी पॅरे मोहन यांची साडेचार एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली होती; परंतु, त्यांची विक्रीपत्र वगैरे काहीही झाले नव्हते.सन २०२१ मध्ये कोतवाल नंदकिशोर यांनी ती शेती खरेदी करून विक्रीपत्रही तयार केले होते.या कारणातून दोघांमध्ये वाद सुरू होता.त्यातूनच धनविजयने नंदकिशोरला संपवण्याचा कट रचला.त्यासाठी त्याने समुद्रपूर येथील आपला मानसपुत्र सोपान जिल्हारे याला बोलावले.त्याने आपला मित्र प्रशांत कुंभरे व अन्य एकाला बोलावले.त्यांनी रेतीच्या बहाण्याने नंदकिशोरला घरून नेले.त्याला दोन बारमध्ये मद्यधुंद होईपर्यंत दारू पाजली.त्यानंतर उमा नदीच्या काठावरून त्याला ढकलले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!