- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-बऱ्याच दिवसांपासून सरपंच संघटनेच्या वतीने सरपंच,उपसरपंच तसेच ग्राम पातळीवरील विविध समस्यांसंदर्भात शासनास निवेदने,आंदोलन करण्यात आले.अशातच आता काही मागण्या पूर्ण होऊ लागल्या आहेत.आज,सोमवार दिनांक-२३ सप्टेंबरला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील सरपंच,उपसरपंच यांना दिलासा देणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.राज्यातील सरपंच,उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतखाली बैठक पार पडली.
या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार ६ हजार,८ हजार आणि १० हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळणार आहे. तर,उपसरपंचांना २ हजार,३ हजार आणि ४ हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळणार आहे.सध्या सरपंचांना ३ हजार,४ हजार आणि ५ हजार रुपये इतके मानधन मिळते.तर उपसरपंचांना १ हजार,दिड हजार आणि २ हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळते.राज्यात एकूण २७ हजार ९४३ ग्रामपंचयाती आहेत. या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक ११६ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.मानधनात वाढ करण्याच्या या निर्णयामुळे सरपंच,उपसरपंच यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- Advertisement -

