- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-वयोमानानुसार शरीर सुदृढ राहावे,यासाठी नेहमीची दिनचर्या करीत असतांनाच अचानकपणे कसेतरी वाटायला लागले आणि खेळ खेळणाऱ्या खेळ पट्टीवरच खाली कोसळल्याने मृत्यूने कवटाळले, अशी काळजाला चटका लावणारी घटना आज, शुक्रवार ६ जून रोजी सकाळच्या सुमारास भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात घडली.सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक बाजीराव चिंधलोरे वय ६० वर्षे यांचा बॅडमिंटन खेळतांना खेळ पट्टीवरच मृत्यू झाला.
जीवनात कधी काय घडणार,हे सांगताच येत नाही.अश्याच प्रकारे नुकतेच पोलीस खात्यातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले बाजीराव चिंधलोरे हे आज शुक्रवारी शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात बॅडमिंटन खेळायला गेले होते.काही काळ त्यांनी सहकारी मित्रासह बॅडमिंटन खेळले.खेळ खेळत असतांनाच त्यांना कसेतरी वाटू लागले व ते खाली कोसळले.प्रसंगावधान साधत उपस्थितांनी तात्काळ धाव घेत त्यांना शहरातील डॉ.झंवर यांच्या खासगी रुग्णालयात हलवले.मात्र,त्यापूर्वीच बाजीराव यांची प्राणज्योत मावळल्याने डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.बाजीराव यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मृत्यूने गाठले असल्याचे स्पष्ट झाले असून अचानकपणे घडलेल्या घटनेने चिंधलोरे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
- Advertisement -

