Friday, May 1, 2026
Homeभंडाराकारवाई न करण्यासाठी घेतली २० हजार रुपयांची लाच-तलाठी अडकला 'एसीबी' च्या जाळ्यात…

कारवाई न करण्यासाठी घेतली २० हजार रुपयांची लाच-तलाठी अडकला ‘एसीबी’ च्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- मोहाडी तालुक्यात तलाठी लाच घेताना

एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.वैनगंगा नदीतून अवैधपणे वाळू उपसा केली जाते.अशा प्रकारे वाळू उपसा केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने तलाठ्याला ताब्यात घेतले आहे.

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे.या वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल तेथे वाळू चोरटे वाळूचा उपसा करतात.अशाच प्रकारे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असताना तलाठी वैभव जाधव याला दिसले.त्यांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर जप्त करतो; नाही तर २५ हजार रूपये मला दे अशी मागणी केली.पण मालकाकडे पैसे आज नाही,उद्या २० हजार रूपये देतो असे ट्रॅक्टर चालकाने सांगितले.

पण ट्रॅक्टर मालकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.सापळा रचून आरोपी तलाठी याला लाचेची रक्कम देण्यात येत असल्याने तलाठी याला संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही.त्यामुळे आरोपी वैभव जाधव याला ताब्यात घेत मोहाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!