- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-लाखनी तालुक्याच्या केसलवाडा वाघ येथील ग्रामपंचायत कार्यालयात जल व्यवस्थापन विभागात रोजंदारीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याचा चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मद्यपान करीत असल्याचा एक व्हिडीओ पुढे आल्यावरून खळबळ उडाली आहे.पारस शेंडे असे मद्यप्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चार वर्षांपूर्वी गावातील नळ फिटिंग,विद्युत फिंटिंग, कर वसुलीची कामे करण्यासाठी रोजंदारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.ही कामे सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयातच लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी हा कर्मचारी ग्रामपंचायतीच वास्तव्यास असायचा.चक्क सरपंच,उपसरपंच यांची पाटी लावलेल्या खुर्चीसमोर बसून तो मद्यपान करीत असल्याचे वायरल व्हिडीओत दिसत आहे.केसलवाडा ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मागील आठवड्यात ग्रामपंचायत प्राथमिक शाळेतील सांस्कृतिक सभागृहात हलविण्यात आली.या कर्मचाऱ्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याने चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच डोलारा सुरू केल्याने सदर प्रकाराची सखोल चौकशी करून त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“ही इमारत आणि कर्मचारी आपल्याच ग्रामपंचायतीचा असून तो रोजंदारी कामगार” असल्याचे सरपंच स्वप्निल बोरकर यांनी सांगितले.
- Advertisement -

